
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शिक्षणाचं अंतिम ध्येय हे सुजाण नागरिकांची निर्मिती हे जर आपण स्वीकारलं असेल तर यात शिक्षकांची भूमिका अंत्यत महत्वाची ठरते. विध्यार्थ्यांच्या उपजत कला -गुणांना वाव देऊन दर्जेदार अध्यापन करणारे शिक्षक जेव्हा शाळेवरून बदलून जातात तेव्हा विध्यार्थ्यांकरीता तो क्षण अतीव दुःखाचा वेदनादायक ठरतो. पिंपरी दुर्ग शाळेतील विध्यार्थीप्रिय शिक्षिका रीना अक्कलवार यांच्या निरोपसमारंभात याचा प्रत्यय आला. आवडत्या मॅडमला निरोप देतांना अश्रूनां त्यांनी वाट मोकळी करून दिली. मॅडमला देखील या वेळी गहीवरून आले.
पिंपरी (दुर्ग ) शाळेतील पदवीधर स. शि. रीना अक्कलवार यांची अंतरगावं येथे बदली झाली. दी.24 सप्टें. ला या निमित्त शाळेत निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुख्याध्यापिका वनिता पाचघरे, ईश्वरकर सर, मनिष काळे सर,अतुल कोवे, कल्पना कोवे आदी उपस्थित होते. व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद कोवे, समिती सदस्य व गावाकऱ्यांनी विध्यार्थीप्रिय शिक्षिका बदलून जाऊं नये या साठी विशेष प्रयत्न केले मात्र प्रशासकीय बाबी मुळे त्यांची बदली अंतरगावं येथे झाली.
या कार्यक्रमाचे निमित्ताने स. शि.ईश्वरकर,मनिष काळे यांनी रीना अक्कलवार मॅडम यांची उत्कृष्ट अध्यापन शैली , विध्यार्थ्यांप्रती त्यांचा जिव्हाळा, आपुलकीचे वर्तन, उपक्रमशीलता, सहकार्याची भावना या विषयावरील आठवणीना उजाळा देणारे मनोगत व्यक्त केले. निरोप समारंभाला उत्तर देताना रीना अक्कलवार यांनी सर्वांचे आभार मानतांनाच, पुढील काळात संधी मिळाल्यास पिंपरी गावाला यायला आवडेल अशी भावना व्यक्त केली. या निरोप समारंभ प्रसंगी अनेक विद्यार्थिनीनां अश्रू अनावर झाले. मॅडम पुन्हा या, लवकर या, अशी विनंती विध्यार्थी -विध्यार्थी करत होते.
