अवैधरीत्या रेती तस्कर करणारे एक ट्रॅक्टर जप्त, बिटरगाव (बु ) पोलीस स्टेशनची धडक कारवाई


प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगाव ( बु )


पोलीस स्टेशनच्या दायऱ्यातील टाकळी ( इ ) येथील नाल्यातील रेती तस्कर होत आहे. अशी गुप्त माहिती मिळताच ठाणेदार सुजाता बनसोड यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रात्रीच्या वेळेस सापळा रचून संपूर्ण पोलीस कर्मचारी टीम दबा धरून बसले होते. महागाव तालुक्यातील फुलसावंगी टाकळी ( इ ) ह्या गावात रेतिमाफिया चि दहशत आहे. ह्या रेती माफिया तष्करांना पकडण्यासाठी गेलेल्या तलाठी, मंडळाधिकारी, तहसीलदार साहेब यांच्यावर अचानक धावा बोलून चाकू, लोखंडी रॉड, काठ्या, बडग्यांनी आक्रमक हल्ला करून अधिकाऱ्यांना जखमी करण्यात आले होते. त्यामुळे फुलसावंगी येथील रेती माफियाची दहशत फुल सावंगी मध्ये असल्यामुळे नदी, नाल्याची खुलेआम रेती तस्कर होत आहे. पण रात्रीच्या वेळेस सापळा रचून बसलेल्या बिटरगाव ( बु ) पोलीस स्टेशनच्या टीम ला टाकळी( इ ) च्या नाल्यातून अवैध रेती तस्कर करणारे ट्रॅक्टर आढळून आल्यावर संपूर्ण पोलीस कर्मचारी टीमने एकदम समोरासमोर जाऊन रेती सह ट्रॅक्टर ताब्यात घेऊन कारवाई केली आहे . विकास भिकू आडे वय 25 वर्ष रा, भिकू नगर फुलसावंगी ता. महागाव हा टाकळी च्या नाल्यातून ट्रॅक्टर क्रमांक एम. एच.29. बि. सि,1475 स्वराज कंपनी चा असून त्याला जोडून लाल रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली. किंमत 4.50.000 व ट्रॅक्टर मधील रेतीची किंमत 6000 हजार रुपये मुद्देमाल मिळवून आला आहे, या कारवाईमुळे फुलसावंगी रेती माफी याचे धाबे दणाणले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी.ए. पि. आय. सुजाता बनसोड. उपनिरीक्षक शिवाजी टीपूर्णे, गजानन खरात एन. पि. सि, मोहन चाटे एन. पि सि. पो. कॉ. निलेश भालेराव, दत्ता कुसरा, प्रवीण जाधव यांनी केली आहे, व पुढील तपास सुजाता बनसोड ठाणेदार हे करीत आहेत,