
सहसंपादक =रामभाऊ भोयर
विदर्भातील अनेक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बँकेच्या पायऱ्या झिजवून अद्यापही पीक कर्ज मिळाले नाही शेतकरी डबघाईस आला आहे. एकीकडे पुणे मुंबई भोवतालच्या शेती साठी ६० हजार कोटींचे कर्ज दिले जाते मग विदर्भ मराठवाडयात शेत जमीन जास्त असताना १९ जिल्यासाठी फक्त २८ हजार कोटीचे कर्ज अशी तफावत का जर मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना पुरेसे अर्थ साहाय्य असेल तर शेतकरी टिकू शकेल अशी माहिती पत्रकार परिषदेत वसंतराव पुरके यांनी दिली.
त्याच बरोबर राळेगांव विधानसभा क्षेत्रात गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. शेतकऱ्यांना शेती करताना अतोनात त्रास सोसावा लागत आहे , राळेगाव शहरात तसेच तालुक्यातील मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे, पिकविमा भरूनही पिकविमा मिळालेला नाही, तसेच लाडकी बहीण योजनेला मुदत न ठेवता कायमस्वरूपी करण्यात यावी, राळेगाव शहरातुन जाणाऱ्या मार्गावर स्पिड ब्रेकर्स देण्यात यावे, धडक विहीरी व घरकुल योजना व इतर विविध विषयांवर प्रा.वसंतराव पुरके यांनी विश्रामगृह राळेगाव येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला बरेच पत्रकार बांधव उपस्थित होते
