दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने उभ्या ट्रक ला दुचाकी धडकली,दोघांचा मृत्यु

वरोरा:- तालुक्यातील टेमुर्डा गावाजवळील पिंपळगावं जवळ सायंकालच्या सुमारास वरोरा येथून दिवाळीचा साहित्य खरेदी करून गावाकडे येत असताना अचानक दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने धाब्या वर उभ्या असलेल्या ट्रक वर दुचाकी आदळून दुचाकीवर असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही मृतक हे महालगावं(खु.) येथील रहिवाशी असून मृतक शुभम गजभे वय 30 असून शुभम ला एक वर्षाची मुलगी आहे तर दुसऱ्या मृतकाचे नाव हर्षल दडमल वय 17 आहे अपघाताची माहित वरोरा पोलिसांना मिळताच पोलीस अपघात स्थळी दाखल होऊन दोन्ही मृतकांचे प्रेत शववविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आले आहे. अधिक तपास वरोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात वरोरा पोलीस करीत आहे
. ऐन दिवाळी च्या दिवशी ही घटना घडल्याने संपूर्ण गावावर दुःखाचा डोगर कोसळलेला आहे.