कासारबेहळ येथे शंकरपट फायनल खेळ संपन्न या खेळमध्ये प्रथम बक्षीस मिळवीला सोपीनाथ महाराज


उमरखेड तालुका प्रतिनिधी:-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण )


राज्यभरात शंकरपटावर बंदी उठवल्यानंतर व कोरोनाच्या काळात शासनाने सगळेच कार्यक्रमावर बंदी टाकल्यामुळे कोणतेच कार्यक्रम झाले नव्हते. हे लक्षात घेऊन पहिल्यांदा कासारबेहळ येथे शंकरपटाचे खेळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या शंकरपटामध्ये गावातील व बाहेर गावातील लोकांनी सहभाग होऊन मोठया संख्याने उपस्थित राहून आलेल्या हौसिनी या पटामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. सदर शंकरपटाचे उदघाटन. संदीप पाटील ठाकरे व रामहरी पाटील अडकीने यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या शंकर पटामध्ये पहिले बक्षीस, सोपीनाथ महाराज (साई )यानी मिळविले आहे तर दुसरे बक्षीस. बाबुसिंग राठोड (तुळसीनगर )तिसरे बक्षीस.सुभाष राठोड (टाकळी )चौथे बक्षीस. संजय पावडे (कासारबेहळ )पाचवे बक्षीस. लक्ष्मीबाई वैध (वडद )साहवे बक्षीस. बंडू राठोड, व रघुनाथ गोपने, सातवे बक्षीस. ओंमकार धनवर (ढाणकी )व अरुण पिटलेवाड (कासारबेहळ )आठवे बक्षीस. चिंतामणी मस्के (टाकळी )व करण चव्हाण (दहिवड )असे आठ बक्षीस वरील मंडळींनी मिळवले आहे या शंकरपट खेळ मध्ये पहिले बक्षीस तीन हजार रुपये श्री. नंदकुमार मस्के (वरोडी )यांच्या कडुन व दुसरे बक्षीस. फरीद राठोड (डीलर )यांच्या तर्फे. शरद राठोड, (सरपंच )कैलास पिटलेवाड,संजय पावडे, गोलू कवाने, बाळू करे, उत्तम मरकटे, संभाजी पावडे, दिलीप पिटलेवाड, विट्टल करे, यांच्या सहकार्याने शंकरपटाचे खेळ हा कार्यक्रम संपन्न झाले