
उपोषण मंडपाला साहेबराव कांबळे (सामाजीक कार्यकर्ते) यांची भेट
माहागाव प्रतीनीधी:- संजय जाधव
महागांव अमडापूर प्रकल्पातील कुरळी येथील ३४० कुटुंबाचा ऐच्छिक पुनर्वसन व मोबदल्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. अनेक वेळा शासन दरबारी पुनर्वसन व पाटबंधारे, मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच आमदार आणि जिल्हाधिकारी आयुक्त अमरावती, उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे सोबतच पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी यांचे कडे अनेक वेळा पायपीट करून हाताश झाल्याने अनेक कुटुंबीयांनी ही टोकाची भूमिका घेतली आहे.
कुरळी च्या ३४० कुटुंबाचा ऐच्छिक पुनर्वसन व मोबदला निकाली काढण्यात आला नाही. तेव्हा
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री आमदार यांनी मंत्रालयात कॅबिनेट मीटिंग लावून हा प्रश्न सोडवावा.
शासनाचे लक्षात आणून देण्यासाठी ११ जानेवारी रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पुनर्वसन मोबदला प्रश्न सुटला नाही तर, येत्या २० जानेवारी रोजी उपोषण व लगेचच जलसमाधी घेणार असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले. सदर निवेदनावर वाल्मीक नारायण करेवाड, भीमराव इंगोले, प्रवीण धार्मिक, यादवराव नपते, कपिल भीमराव आढागळे सह जवळपास १६७ लाभार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.या उपोषण स्थळाला दराटी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार संजय मातोडकर यानी उपोषण स्थळी चौक बंदोबस्त ठेवला होताप्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टाचेवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणकर्त्याची तपासणी करण्यात आली
