
देशभरातील स्त्री ,मुलींवर सुरू असणाऱ्या अत्याचाराने पुरता देश हादरला आहे. स्त्रियांवरील अत्याचाराने समाजातील पुरुषाची प्रतीम मलिन करण्याचे काम होत आहे . एखाद्या दोन ,तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार ही किती खराब मानसिकता समजातील नराधमांमध्ये आहे .
जिल्हाभरात महिला ,मुलींवर होणाऱ्या घटना मागील काही दिवसापासून वाढल्या आहेत .त्यात दोन तीन वर्षाच्या मुलापासून मानसिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मुली स्त्रियापर्यंत अत्याचाराच्या घटना घडत आहे .विद्येचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या शाळेत ,महाविद्यालयात मुलीचा होणारा विनयभंग , अत्याचार हा सध्या तरी समाजाला काळीमा फासणारी घटना आहे .शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या देखील समाजात सुरक्षित नाही.यापेक्षा अजून दुर्दैव काय?
शिक्षक हा समाजाचा आरसा असतो एक चांगला संमज घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची असते परंतु मागील काही दिवसांपासून शालेय मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ ही चिंतेची बाब आहे.
वरोरा शहरात काही वर्षाआधी नामांकित महाविद्यालयात मुलींच्या स्वचछतागृहांत स्पाय पेन कॅमेरा लावून व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या शिक्षकाचा घृणास्पद प्रताप उघड झाला होता. त्यामुळे त्या महाविद्यालयातील विद्यार्थिनीची चित्र्फित त्या नराधम शिक्षकाकडे होत्या.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षक या प्रतिमा मलिन झाली होती .तो विषय तिथेच थांबला असे होत नाही .या विकृत मानसिकतेचे अशे किती शिक्षक आहेत हा प्रश्न मात्र चव्हाट्यावर आला होता.अशीच घटना दिनांक 26 ऑगस्ट वरोरा शहरतीलच एका प्रसिद्ध , नामाकित कनिष्ठ विद्यालयात घडली आहे .शिक्षक हा आपला गुरू या नात्याने एक विद्यार्थिनी शिक्षकांच्या वाढदिवसाला त्याचा घरी पोहचली मात्र त्या शिक्षकांच्या मनातील विकृत नराधम बाहेर पडत दोन वडिलांच्या वयाच्या असणाऱ्या शिक्षकाने मुलीवर अत्याचार केला .नेहमीप्रमाणे याही वेळेस समाज एकत्र येत विरोध झाला आरोपीला अटक व्हावी यासाठी नागरिक मुक आंदोलन ,शाळा बंद , निलंबन करा ,शाळा प्रशासनावर दबाव आणत शिक्षकांचे निलंबन करायला भाग पाडले खरे पण अश्या किती मुली या नराधमाच्या बळी पडल्या असेल याचा अंदाज ही न लावलेला बरा.
गावभरात चर्चा अजूनही काही नराधम शिक्षकांच्या पोशाखात
याच प्रकारनातील आरोपीस अजून काही नराधम यात सामील आहे अशी गावभर चर्चा पसरली आहेत यात वेगवेगळे नाव देखील बाहेर येत आहे पण या दोघांचा बळी घेल्याने ते नराधम सुधारतील की पुन्हा त्यांच्या मनातील नराधम बाहेर पडून अजून काही विद्यार्थिनींना बळी पडावं लागेल याची शक्यता नाकारता येणार नाही हे ही तितकेच खरे
तरीही समजातील चांगल्या ,सुसंस्कृत शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
