राळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे ग्रामपंचायतला स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राज्य शासनाच्या आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव (स्मार्ट ग्रामपंचायत) पुरस्कार योजना अंतर्गत सन २०२१/२०२२करीता राळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे ग्रामपंचायत ची निवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या वतीने स्मार्ट गाव पुरस्कार योजनेअंतर्गत शासनाकडून देण्यात आलेल्या निकषांचे आधारे गुणांकन पध्दतीने पारदर्शकता ठेवून राळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे ग्रामपंचायत ची स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात आली आहे.व्यवस्थापन, दायित्व, पर्यावरण, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, आरोग्य, स्वच्छता या आधारावर तालुक्यातील ग्रामपंचायतींची तपासणी करून सर्व द्रुष्टीने अव्वल असलेल्या कीन्ही जवादे ग्रामपंचायत ची स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात आली.कीन्ही जवादे ग्रामपंचायत चे कर्तव्यदक्ष सरपंच सुधीरभाऊ जवादे आणि सहकार्यांनी १००% कोरोना लसिकरण करून विभागात प्रथम क्रमांक मिळविला होता,लक्षणिय स्मशानभूमीची निर्मिती, ऐक वार्ड ऐक ट्रान्सफॉर्मर, स्वच्छ पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन यांत ग्रामपंचायत चे उत्तम काम आहे.व महीलांना सन्मान मिळावा याकरिता स्वातंत्र्य दिनी विधवा महिला व अल्पभूधारक शेतकरी महिला यांच्या संयुक्त हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ISO ग्रामपंचायत, गावातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना निराधार योजनेचा लाभ मिळवून देणे, मतदार यादी १००%आधार लिंक करणे,या सर्व बाबींमुळे “स्मार्ट ग्रामपंचायत चार दहा लक्ष रुपये चार पुरस्कार प्राप्त झाल्याचे सरपंच सुधीरभाऊ जवादे यांनी सांगितले.याकरिता सरपंच सुधीरभाऊ जवादे, उपसरपंच रमेश तलांडे, सदस्य प्रसाद निकुरे, प्रतिभाताई मोहुर्ले, सुषमाताई जवादे, सिमाताई ऊईके, मालाताई लोणबले सचीव सुनील येंगडे साहेब कर्मचारी पुंडलिकराव लोणबले, मारुती ईठाळे, धनराज तोडसाम, आशावर्कर सुशीलाताई मेश्राम, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी , पंचायत समितीचे अधीकारी, पोलिस पाटील अनुराग जवादे,व गावातील प्रगतीशील विचारांचे सर्व नागरिक यांनी मोलाचे सहकार्य केले.