
सहसंपादक: रामभाऊ भोयर
3 जानेवारी हा दिवस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालीका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेताजी विद्यालय राळेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवसा निमित्य स्वयम शासन घेण्यात आले या मध्ये काही विद्यार्थ्यांनी शिक्षक बनुन विद्यार्थ्यांना शिकविले यामध्ये वर्ग 10 वी ची विद्यार्थिनी कु निधी झोटिंग हिने मुख्याध्यापक म्हणून एक दिवसाचे प्रशासन सांभाळले,काही विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून खुप चांगले अध्यापन केले. मध्यानानंतर सावित्रीबाई फुले यांचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक पी पी ओंकार सहायक शिक्षक पी एस वासेकर, व्ही आर कुबडे, शिक्षिका एम डी सोनोने आणि विद्यार्थ्यानी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गीत सादर केले.वर्ग 9 वी ची विध्यार्थीनी कु तन्वी गौरकार हिने मी “सावित्रीबाई बोलते” ही एकांकिका सादर केली, कार्यक्रमाच्या शेवटी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली,ज्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली त्यांना पारितोषिक म्हणून थोर पुरुषांची पुस्तके भेट देण्यात आली, तसेच वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगली माहिती दिली त्यांना सुद्धा पारितोषिक देण्यात आले शेवटी गावामधून स्वच्छता फेरी काढण्यात आली, या फेरी च्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली,
या कार्यक्रमाचे संचालन वर्ग 9 वी ची विध्यार्थीनी वृषाली धुर्वे तसेच प्रास्ताविक सहायक शिक्षिका कु एस एस चावट तर आभार प्रदर्शन वर्ग 10 वी ची विध्यार्थीनी निधी धोटे हिने केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक शिक्षिका कु एम ए केवटे, कु आर डी सिडाम,कु एम बी नागरे कु एस बी वानखडे व शिपाई सचिन पांडे यांनी अथक परिश्रम घेतले.
