धक्कादायक:उमरखेड तालुक्यातील साखरा येथील पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार आरोपी अटक.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील साखरा येथे सात वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केला असून आरोपी शिवराम पुताची मात्रे वय 68 वर्षे याला अटक केली आहे.
त्याने पिडीत मुलीस पाच रुपयाचे अमिष दाखवून घराजवळील बाजूच्या कोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असून फिर्यादीवरून उमरखेड पोलिस ठाण्यात आरोपीवर 376, 376 अ ब भादवि 4/8 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास ठाणेदार आनंद वागतकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय बनसोड मॅडम,NCP रवी चव्हाण करीत आहे.