
प्रतीनीधी: शेख रमजान बिटरगांव (बु.)
पैनगंगा अभयारण्य चाळीस हजार हेक्टर असून पैनगंगा अभयारण्यात मौल्यवान वनस्पती सागवान रक्तचंदन पांढरा पळस अशा अनेक वनस्पती या अभयारण्या मध्ये असून या अभयारण्याची निर्मिती 1965 साली झाली येथील काही कर्मचारी जंगल अहोरात्र जतन करतात पण यांना राहण्याची दयनीय अवस्था असून राहण्या साठी निवासस्थान नसून.
शेतकऱ्यांना पाऊस हवाहवासा वाटत असला तरी वन विभाग कार्यालयात मात्र नकोसा असल्याची स्थिती आहे. याला कारणही विशेष आहे. येथील विभागीय वन अधिकारी पांढरकवडा यांच्यामार्फत अनेक वेळा प्रस्ताव पाठवण्यात आले तरी या कार्यालयात सध्या टिप टिप बरसा पाणी अशी स्थिती ओढवते. यामध्ये कागदपत्रे, कॉम्प्युटर खराब होण्याची शक्यता लक्षात घेता, संपूर्ण कार्यालयाच्या टिनावर प्लास्टिकचे कव्हर टाकण्यात आले आहे.
पैनगंगा अभयारण्य बिटरगांव ( बु ) येथील वसाहतीची दैयनीय अवस्था आहे. ह्या कार्यालयाची 1965साली निर्मिती झाली व कित्येक वर्ष जुने आहे या कार्यालयावर ॲसबेस्टॉसच्या टिनाचे छत आहे. या टिनाला अनेक ठिकाणी भेगा व छिद्र पडली आहेत. त्यामुळे थोडा जरी पाऊस आला तरी छत गळायला लागते. त्यामुळे येथील वनविभागाच्या सर्व कक्षावर आता प्लास्टिकचे कव्हर लावण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना गळती थांबली आहे.
पावसापासून बचावासाठी वनविभाग कार्यालय व संपुर्न क्वार्टर अशा प्रकारे पन्नीने झाकले आहे.
प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडे मागणी
प्रशासकीय वन भवनाचा प्रस्ताव शासनाला दरवर्षी पाठविण्यात येत आहे. तरी शासनाला जाग का येत नाही, या प्रस्तावावर निधी उपलब्ध झाल्यास सर्व निवासस्थान व कार्यालयांना नवीन इमारत मिळू शकते.कार्यालयाची इमारत जुनी असल्याने काही ठिकाणी पाणी गळते. त्यामुळे तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. इमारत दुरुस्तीसाठी सध्या निधी उपलब्ध नाही. कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचे छत खपरेलु असल्याने सर्व ऋतुमध्ये कर्मचाऱ्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे.दुरुस्ती साठी निधीची वानवा असल्याने नव्या इमारतीची सर्वांना प्रतीक्षा.
