
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ वरून राळेगाव येथे येत असलेल्या पवन ट्रॅव्हल्सच्या मोटरसायकल वर आलेल्या दोन आरोपींनी रस्त्यात अडवून तलवारीने काचा फोडल्या.
ही घटना यवतमाळ ते राळेगाव सिमेंट रोडवरील वसंत जिनिंगचे कॉम्प्लेक्स जवळ दिनांक सात सप्टेंबर रोजी साडेचारच्या दरम्यान घडली. गौरव रामभाऊ राऊत वय २७ वर्ष,लखन मस्कर वय ३३ वर्ष दोघे रा.कळंब हल्ली मुक्काम राळेगाव अशी आरोपींची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राळेगाव येथील राकेश कृष्णराव राऊळकर यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे त्यांच्या मालकीची पवन ट्रॅव्हल्स असून ही ट्रॅव्हल्स राळेगाव ते यवतमाळ आणि यवतमाळ वरून राळेगाव अशाप्रकारे नेहमी प्रवासी वाहतूक करते नेहमीप्रमाणे ट्रॅव्हल्स चालक मनोज वाणी हा यवतमाळ वरून राळेगाव येथे प्रवाशी घेऊन येत असतांना यवतमाळ राळेगाव सिमेंट रोडवरील वसंत जिनिंग कॉम्प्लेक्स जवळ मागून दोन इसम मोटरसायकलने आले व त्यातील एकाने हातातील तलवारीने ट्रॅव्हल्स गाडीचा काच फोडला आणि ड्रायव्हर जवळ येऊन ड्रायव्हर साईटचा काच तलवार मारून फोडला.व घटनास्थळावरून आरोपी कळंबच्या दिशेने रवाना झाले. चालकाने ही माहिती ट्रॅव्हल्स मालकाला दिली यामध्ये ट्रॅव्हल्स मालक राकेश राऊळकर यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी घटनेची फिर्याद ट्रॅव्हल्स मालकाने राळेगाव पोलिसात दिली.
राळेगाव पोलिसांनी या प्रकरणातील वरील दोन्ही आरोपीला अटक करून त्यांच्या जवळून गुन्ह्यात वापरलेली तलवार व विनाक्रमांकाची मोटरसायकल जप्त करून त्यांचे विरुद्ध शस्त्र बाळगणे अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास राळेगाव पोलीस निरीक्षक सिताराम मेहत्रे यांचे मार्गदर्शनात गोपाल वास्टर गोपनीय शाखेचे रुपेश जाधव हे करीत आहे.
