
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राज्यात २०१६ पासून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविली जात आहे पूर्वी शेतकऱ्यांना खरीप हंगामा करिता दोन टक्के व नगदी पिकासाठी पाच टक्के रक्कम भरावी लागत होती मात्र राज्यात सन २०२३-२४ या वर्षांपासून पासून सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्यात येत असून केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना पिक विमा काढण्याची सवलत दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावी व तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत एक रुपयात विमा भरून घ्यावा असे आवाहन तहसीलदार अमित भोईटे यांनी केले आहे
या पीक विमा योजने अंतर्गत जोखमीच्या बाबींचा समावेश केला असुन त्यामध्ये
हवामान घटकाच्या प्रतिकुल परिस्थीतीमुळे पिकांची पेरणी न झाल्यामुळे होणारे नुकसान तसेच पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान.
पिक पेरणी पासुन काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर क्षेत्र जलमय होणे, भुस्सखलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग या बाबीमुळे हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट
स्थानिक नैसर्गीक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान
नैसर्गीक कारणांमुळे पिकांचे काढणीपश्चात नुकसान या बाबीचा समावेश आहे. पिक विमा नोंदणी करणेसाठी शेतक-यांनी जवळच्या सी.एस.सी सेंटर, आपले सरकार केंद्र तसेच ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र आणि सेतु सुविधा केंद्र जावून पीक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे . त्याचप्रमाणे ई -पिक पाहणी प्रकल्पा अंतर्गत ई-पीक पाहणी या मोबाईल अॅपद्वारे शेतकरी आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतःच्या मोबाईलमधून करू शकतात. तरी ई-पिक पाहणी या मोबाईल अॅप मधून सर्व शेतक-यांनी पिक पे-याची नोंद करावी असे आवाहन देखील तहसीलदार राळेगांव यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी ज्या पिकाचा विमा उतरवायचा आहे ते पीक शेतात पेरल्याबद्दल चे स्वघोषणापत्र, सातबारा उतारा, आधार कार्ड, व बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रतिसह नजीकच्या महा-ई-सेवा केंद्रात अथवा सेतू सुविधा केंद्र मध्ये जावून आपला पिक विमा काढून घ्यावा
अमित भोईटे
तहसीलदार राळेगाव
