
चहांद येथील ग्रामपंचायत सदस्य निखिल शेळके यांच्या पाठपुराव्याने विकासाची गंगा आली आहे. सविस्तर वृत्त असे निखिल शेळके यांनी राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार अशोक उईके यांच्या कडे चहांद येथील विकास कामाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर शेळके यांच्या सांगण्यावरून मौजा चहांद येथील यशवंत राव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत घरकुल वाटप करण्यात आले होते. सदर आज रोजी चहांद येथे वाटप केलेल्या घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. घरकुलाचे काम पूर्ण होताच आमदार अशोक उईके यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलचे वाटप करून त्यांना घराच्या चाब्या देण्यात आल्या तसेच चहांद येथील स्मशान भूमी कडे जाणाऱ्या नाल्या वर पूल बांधून त्याचे लोकार्पण करण्यात आले व तांडा वस्ती योजने अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोड चे लोकार्पण करण्यात आले व पुला पासून स्मशान भूमी पर्यंत जाण्या करीता सिमेंट रोड ला लागणाऱ्या रोड करीत 25 लक्ष ची घोषणा करून तात्काळ मजुरी देण्यात आली व शेतकऱ्यांकरिता शेतातील लाईन करीता नवीन 2 डीपी मंजूर करून दिल्या आहे. सदर या लोकार्पण सोहळ्याला व घरकुल लाभार्थ्यांना घराचे वाटप करतेवेळी उपस्थित राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार अशोक उईके, गट विकास अधिकारी केशव पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, सामाजीक कार्यकर्ते संजय काकडे , श्रीरंग चाफले, अनिल नंदुरकर,शारदानंद जैस्वाल, महेश आवारी, रणजित ठाकरे व गावातील सरपंच, उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य व गावातील नागरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते
