अभाविप चे ५३ वे विदर्भ प्रांत अधिवेशन नागपुरात

सहसंपादक : रामभाऊ भोयर

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विदर्भ प्रांताचे ५३ वे अधिवेशन येत्या २८, २९, ३० जानेवारी २०२५ रोजी नागपुरात आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी, क्षेत्रीय संघटन मंत्री गीतेश चव्हाण, प्रदेश अध्यक्ष प्रा. नितीन गुप्ता, प्रदेश मंत्री पायल किनाके, प्रदेश संघटन मंत्री विक्रमजित कलाने, प्रदेश सहसंघटन मंत्री मनोज साबळे यांच्या उपस्थितीत अधिवेशनाच्या लोगोचे विमोचन नागपुरात करण्यात आले.
अभाविप हे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे जगातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन आहे. अभाविपने देशभरात ५५,१२,४७० सदस्यता करून पुन्हा एकदा जगातील सर्वांत मोठे विद्यार्थी संघटन म्हणून विक्रम प्रस्थापित केला. विद्यार्थी परिषद दरवर्षी आपले प्रदेश अधिवेशन आयोजित करीत असते. या अधिवेशनात विदर्भ प्रांतातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात युवा, तरुणाई विद्यार्थी एकत्र येत असतात. या अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर सर्व विद्यार्थ्यांचे मत घेऊन त्या समस्या सोडविण्यासाठी प्रस्ताव पारित होतात.
विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन म्हणजे तरुणाईमध्ये उत्साह, ऊर्जापूर्ण वातावरण निर्माण करण्याचे एक कार्य आहे. प्रदेश अधिवेशनात प्रदेशाचे नूतन अध्यक्ष, मंत्री आणि कार्यकारिणी घोषित होत असते जी संपूर्ण वर्षभरात कार्यरत असते.