
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आज दि.9.12.2023 रोज शनिवारला जि प. उच्च प्राथमिक शाळा येवती येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. या कार्यक्रचे अध्यक्ष संतोषराव पारधी (माजी पोलीस पाटील ) हे असून प्रमुख पाहुणे शिंदे सर (मुख्याध्यापक जि. प. शाळा येवती )हे होते या कार्यक्रमाला महत्वाची भूमिका असणारे विद्यार्थ्यांचे सर्व पालक सुद्धा हजर होते. हजर असलेल्या पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. संतोषराव पारधी यांचे स्वागत सरोदे सर यांनी केले व शिंदे सर यांचे स्वागत चालखुरे सर यांनी केले. सूत्रसंचालन सौं. माकोडे मॅडम यांनी केले तसेच सौं बोदाडे मॅडम सुद्धा सहकार्य लाभले स्वागत समारंभ झाल्यानंतर पालकांमधून समितीची निवड करतांना साईनाथ भोयर यांची अध्यक्ष स्थानी निवड निवड करण्यात आली व किसन कोल्हे यांची उपाध्यक्ष स्थानी निवड करण्यात आली असून इतर सर्व सदस्यांची निवड पालकांमधून करण्यात आली. इतर सदस्य खालीलप्रमाणे 1)प्रमोदराव कोल्हे 2)माणिकराव जुमनाके 3)स्वाती गुडधे 4)सोनाली वत नदार 5)मंजुषा कुबडे 6)सविता धोटे 7)संगीता नेहारे 8)रामाजी महाजन (शिक्षणप्रेमी )9)सरोदे सर (शिक्षक प्रतिनिधी )10)शिंदे सर (सचिव )यांची निवड करण्यात आली व आभारप्रदर्शन सरोदे सर यांनी केले.
