
मी हृदय विकाराच्या झटक्यातून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा कर्त्यावर – तहसीलदार – डि.एन.गायकवाड
लोकहित महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी,
कृष्णा राठोड -९१४५०४३३८१
हिमायतनगर /-
तालुक्याचे विद्यमान तहसीलदार डी.एन. गायकवाड यांना मागील एक महिन्या खाली अतिवृष्टीत च्या पूरग्रस्तांची पाहणी करताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती या कारणास्तव रजेवर गेले होते. गेले काही दिवस त्यांना डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले होते . काही दिवस आराम करुन ते दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी रुजु झाले आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या परीस्थितीची जाण, शांत, संयमी, अभ्यासपूर्ण उत्तर देण्याची क्षमता, मृदुभाषी असलेल्या तहसीलदार गायकवाड सर यांची हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी नेहमीच वाट पाहत होते. यावर्षी अतिवृष्टीने कहर केलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील सत्तापालटाने शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या प्रचंड होत्या. परंतु अद्याप लवकर शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळेल, की नाही अश्या संभ्रमात तालुक्यातील शेतकरी बांधव आहेत.
पण काहिही असो हिमायतनगर तहसिल कार्यालयातील जनतेच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी, तहसील कर्मचाऱ्यांना शिस्त आणि नियम लावण्यासाठी तहसीलदार गायकवाड सरांचे नांव आज सर्वसामान्य जनतेच्या मुखातून नेहमीच बाहेर येते. यात कुठलेही दुमत नाही.
हिमायतनगर तालुक्याचे गायकवाड डि.एन. यांनी पुन्हा एकदा पदभार स्वीकारल्यानंतर संबंध हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी, भुमीहिन, कष्टकरी, सर्वसामान्य जनता अत्यंत खुष असल्याचे चित्र एका शेतकऱ्याने बोलुन दाखवले आहे.
मी आपल्या आशीर्वादानेच एवढ्या मोठ्या संकटावर मात करून मी आपल्या सेवेसाठी पुन्हा कर्तव्यावर आल्याचेही उद्गार व्यक्त केले आहे.
हिमायतनगर येथील तहसीलदार गायकवाड साहेब पुन्हा कर्तव्यावर आल्याने तालुक्यातील सर्व स्तरावरून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
