17,130 पदांची पोलीस भरती जाहीर!! 3 नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरु होणार!!

आताच प्राप्त माहिती नुसार पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 3 नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होणार, तसेच 30 नोव्हेंबर २०२२ हि अंतिम तारीख आहे. या संदर्भातील अधिकृत वेबसाईट वर GR आणि माहिती अजून यायची आहे. अधिकृत माहिती आल्यावर आम्ही प्रकाशित करूच. तसेच पोलीस भरती २०२२ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स दिलेली आहेत.
राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सहास्त्र पोलीस शिपाई संवर्गात सुमारे ११४४३ इतकी पदे भरतीसाठी (Police Recruitment) उपलब्ध होणार आहेत. पदभरतीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या असून यामध्ये सुधारीत आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. सद्यस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्‍यकता असल्याने सदर संवर्गातील १०० % रिक्‍त पदे तातडीने भरणे आवश्‍यक आहे. त्यानुषंगाने संदर्भाधिन क्र. १ च्या शासन निर्णय, वित्त विभाग दि. १२/०४/२०२२ च्या तरतूदीमधून सूट मिळण्यासाठीच्या प्रस्तावास दि. २७/०९/२०२२ रोजीच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
पद संख्या – 21,764 जागा
शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
वयोमर्यादा –
खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in
14956
पोलीस शिपाई जागा

2174 पाेलिस वाहनचालक जागा –

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – जिल्हानिहाय जाहिराती
मुंबई पोलीस भरती 2022 – 7,734 पदे
पुणे पोलीस भरती 2022 – 795 पदे
ठाणे पोलीस भरती 2022 – 521 पदे
पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2022 – 216 पदे
मीरा भाईंदर पोलीस भरती 2022 – 996 पदे
नागपूर पोलीस भरती 2022 – 429 पदे
नवी मुंबई पोलीस भरती 2022 – 204 पदे
अमरावती पोलीस भरती 2022 – 41 पदे
सोलापूर पोलीस भरती 2022 – 171 पदे
मुंबई रेल्वे पोलीस भरती 2022 – 620 पदे

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या आठवडाभरात 18000 पोलीसांच्या भरतीची जाहिरात निघणार आहे. मुख्यमंत्र्यांनी इतर विभागांना आदेश दिलेले आहेत की, ज्या कोणत्या विभागांमध्ये जागा रिकाम्या असतील त्या जागांचा रिपोर्ट तयार करावा आणि विभागानुसार लवकरच नोकरीची जाहिरात काढावी, यामुळे अजून इतर वेगवेगळ्या विभागातील जाहिराती निघण्याची शक्यता आहे. म्हणजेच अजून मोठी भरती होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. या व्यतिरिक्त केंद्र सरकारची दहा लाख रोजगार निर्माण, महाराष्ट्राची 75000 रोजगाराची घोषणा, तसेच इतर स्वयंरोजगार संबंधीच्या संधीही उपलब्ध करून देऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.