
राळेगांव :— तालुका प्रतिनिधी :रामभाऊ भोयर
विविध क्षेत्रात कार्य करताना सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवीत शासन प्रशासनात तसेच अन्य क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्याचा अविस्मरणीय सोहळा सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ येथे दिं ६ नोव्हेंबर २०२२ रोज रविवारला चांदोरे नगर जवळ धामणगाव रोड यवतमाळ येथे पार पडला असून राळेगांव येथील पब्लिक पोष्टचे तालुका प्रतिनिधी मनोहर बोभाटे यांना साहित्य सांस्कृतिक अकादमी सत्यशोधक विद्यापीठ पुणे यांचे कडून उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सुनील शिवप्रसाद विभूते सोलापूर यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी पुरस्कार सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध समाजसेविका डॉ लीला भेले समाजसेविका , जोहराआई कांबळे नागपूर, प्रदीप झाडे, नेर अर्बन बँक तर प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र फुलझेले अतिरिक्त जिल्हाधिकारी वर्धा , डॉ ज्ञानेश्वर मोरे सत्यशोधक विद्यापीठ,प्राचार्य प्रियदर्शनी वाकडे संचालक साहित्य व सांस्कृतिक अकादमी पुणे, मां. शेषेराव डोंगरे अनाथ व वृद्धांचा बाप,उमरी पठार आदी प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला आहे. यावेळी मनोहर बोभाटे याना साहित्य सांस्कृतिक अकादमी राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने राळेगांव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तसेच तालुक्यातील मित्रपरिवाराकडून सर्वत्र त्यांचे अभिनंदन वर्षाव होत आहे.
