

माहागाव प्रतीनीधी:- संजय जाधव
मनुष्यजन्म दुर्लभ असून, या जन्मात माणसाला परमार्थ करण्याची संधी असते. मात्र मनुष्य संसारात अडकून पडतो. संसार क्षणभंगूर असून, त्याचा काहीच भरवसा नाही, असे प्रतिपादन संगीत विशारद ह .भ.प.विवेक महाराज यांनी केले. माहागाव तालुक्यातील फूलसांवगी येथील पूणेश्वर मंदीर पायत्याशी फुलसावगी येथील भाविकभक्ताच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आज तिसरे पुष्प गुंफताना ते भाविकांना हितोपदेश करत होते.
प्रारंभी श्री प्रकाश जाधव सपत्नीक आणि भावीक भक्त यांच्या हस्ते ग्रंथपूजा करण्यात आली.
मनुष्य जन्माचा योग्य तो उपयोग केला नाही, तर नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. संसार ही नदी
असून, तिच्यात मायेच्या पुराचा लोंढा भरला आहे. तो एकदा का वाहून गेला की मागे काहीच शिल्लक राहत नाही. संसाररूपी या भवनदीचे पाणी भल्या भल्या पोहणाऱ्यांनाही आपल्यात ओढते आणि वाहून नेते. भवनदीच्या पुरातून वाचायचे असेल तर सद्गुरुचे पाय धरायला हवेत. तेच आपल्याला उद्धारून नेऊ शकतील. आयुष्य फार सुंदर आणि अद्भुत आहे. त्यातील आनंदाचा शोध घ्या. परमार्थात, भक्तीत खरा आनंद आहे. दुसऱ्याचे धन आपल्याकडे येता कामा नये. नित्य दान, समाजासाठी थोडा वेळ आणि श्रम या तीन आज्ञांचे पालन केल्यास मनुष्यजन्म सफल होईल.
दरम्यान, आज या सप्ताहाची मोठ्या भक्तीमय आणि उत्साहाच्या वातावरणात तिसरे पुष्प गूंपन्यात आले . सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
