सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ पोलीस स्टेशन वसंतनगर हद्दीतील युवकाचा खुन करुन मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केले प्रकरणी दाखल गुन्हयाचा काही तासातच छडा लावुन केली 4 आरोपींना अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई
धम्मनगर श्रीरामपुर पुसद येथे एका युवकावर अज्ञात आरोपी यांनी धारधार शम्बांनी वार करुन त्याग निवेदार करुन त्याचे प्रेत निर्जन स्थळी टाकले असल्याबाबतची बातमी दिनांक 30/09/2024 रोजी पुसद शहरात पसरताच म्थानिक गुन्हे शाखेच अधिकारी व अंमलदार यांनी याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना माहीती देवून त्यांचे मार्गदर्शनात सदर घटनेची शहानिशा करण्याकरीता गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून पोलीस कौशल्याचा वापर करीत गोपनिय माहीती काढली असता इसम नामे अविनाश संतोष शिंगारे हा दिनांक 29/09/2024 रोजी 22.30 वा. पासून बेपता असल्याबाबत माहीती मिळाल्याने तसंच त्याम कोणीतरी अज्ञात इसमांनी धारधार शस्त्राने त्याचेवर वार करुन जिवे ठार मारल्याचे व पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने त्याचे प्रेत कोठेतरी बेवारस स्थितीत टाकून दिले असल्याचा संशय बळावल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने पोलीस कौशल्याचा वापर तसेच गोपनिय माहीती व तांत्रीक पुराव्याच्या आधारे अतिशय शिताफीने इसम नामे-बाबुराव ग्यानवा खडसे व अनिकेत वसंता खंदारे दोन्ही रा. धम्मनगर श्रीरामपुर यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी व त्यांचे इतर साथीदार समाधान बाबूराव खडसे, संदीप रामेश्वर कदम व एक अल्पवयीन यांनी मृतक अविनाश संतोष शिंगारे वय 27 वर्ष रा. धम्मनगर श्रीरामपुर पुसद यांचेवर दिनांक 29/09/2024 रोजी 22.00 वा ते 22.30 वा. दरम्यान धारधार शस्वाने वार करुन त्यास जिवेठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यास धम्मनगर बाजूला असलेल्या कॅनोल मध्ये टाकून दिले असल्याचे कवुल करुन मृतक अविनाश संतोष शिंगारे यांचे प्रेत ज्या ठिकाणी बेवारस स्थितीत टाकून दिले ते ठिकाण दाखवून गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यावरुन मृतक यांचा भाउ रवि संतोष शिगारे वय 30 वर्ष रा. धम्मनगर श्रीरामपुर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ यांनी दिलेल्याफिर्यादी वरुन वसंतनगर पोलीस स्टेशन अप क्रमांक 459/2024 कलम 103(1), 238, 189(2), 191(2), 191(3), 190भा.न्या.संहीता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हा केल्यानंतर फरार झालेले आरोपी समाधान बाबुराव खडसे, संदीप रामेश्वर कदम दोन्ही रा. धम्मनगर श्रीरामपुर पुसद यांची गोपनिय व तांत्रीक माहीती काढता सदर आरोपी नागपुर येथे असल्याची खात्री झाल्याने त्याचे शोधा करीता पोलीस पथक रवाना केले असता आरोपी हे नागपूर येथून यवतमाळ करीता येत असल्याची व ते कळंब ता. कळंब जि. यवतमाळ बस स्टॅन्ड येथे असल्याची तांत्रीक व गोपनिय माहीती मिळाल्याने कळंब बस स्थानक येथे सापळा कारवाई करुन त्यांना अतिशय शिताफिने ताब्यात घेण्यात आले.
अशा प्रकारे सदर गुन्हयातील आरोपी 1) बाबुराव ग्यानवा खडसे वय 50 वर्ष, 2) अनिकेत वसंता खंदारे वय 20 वर्ष, 3) समाधान बाबूराव खडसे वय 24 वर्ष, 4) संदीप रामेश्वर कदम वय 25 वर्ष सर्व रा. धम्मनगर श्रीरामपुर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ यांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन वसंतनगर यांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप, अति पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद श्री हर्षवर्धन बी जे. पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानोबा देवकते, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, पोलीस निरीक्षक श्री मतिष जाधव, पोलीस स्टेशन वसंतनगर यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, पोशि/मोहम्मद ताज सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली .