
:- आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक मजहर खान यांच्या हस्ते कुणाल दुर्गे यांना सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट प्रदान.
कारंजा घाडगे/ प्रतिनिधी/पियूष रेवतकर
कारंजा (घा):- वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील कराटे प्रशिक्षक कुणाल दुर्गे यांना सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट प्रदान. आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक मजहर एस.खान यांच्या हस्ते कुणाल दुर्गे यांना सेकंड डिग्री बेल्ट प्रदान करण्यात आले.दिनांक २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त नागपुर येथे आयोजित कार्यक्रमा मध्ये कुणाल दुर्गे यांना सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला.२३ व्या इंटर स्कूल नागपुर जिल्हा स्काय चॅम्पियनशिप २०२२-२०२३ नागपुर येथे आयोजित कार्यक्रमा मध्ये कारंजा येथील कराटे प्रशिक्षक कुणाल दुर्गे यांना कराटे खेळातील नावाजलेल व्यक्तिमत्त्व मजहर खान यांनी कुणाल दुर्गे यांना स्वतः सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट प्रदान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कुणाल दुर्गे गेल्या अनेक वर्षापासून सूर्योदय कराटे क्लब कारंजा येथे विद्यार्थ्यांना कराटेच प्रशिक्षण देतात व त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थ्यांनी कराटे खेळात नाव मोठे केले.कुणाल यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आई – वडील आणि त्यांचे गुरू मुकेश ठाकरे व सहकारी कराटे प्रशिक्षक मंगेश गाडरे,पिंटू सावरकर,संदीप काशीकर यांना दिले.कुणाल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.कारंजा शहरातील विविध राजकीय पक्ष व सामजिक संघटने तर्फे कुणाल यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
