
प्रतिनिधी,प्रवीण जोशी
ढाणकी…
फळाचा अधिनिस्त सम्राट म्हणून वराडा मध्ये आंबा फळ ओळखल्या जाते आता जरी विविध ठिकाणी आधुनिकतेचा आधार घेत हापूस आणि इतर आंब्याच्या जाती प्रचलित झाल्या असतील पण याची अभिवृद्धी त्या त्या ठिकाणच्या आंब्यावरील कलमा घेऊन मृदकाष्ट, कोय कलम याला अनुसरून केलेल्या बाबीचा वापर म्हणायला हरकत नाही. अशा विविध बाबींनी आंब्यांच्या वृक्षाचा प्रचार व प्रसार झाला. हे जरी खरे असले तरी सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना या फळाची फलश्रुती करणे जरा महाग होत चालले आहे. सध्या एका विचित्र आणि अद्भुत वातावरणाची जाण बघायला मिळत आहे कधी ऊन कधी उष्णता व उष्ण दमटपणा या त्रीसूत्रि वातावरणामुळे आंबा बहरतो की नाही अशी अवस्था व भीती सगळ्यांनाच होती पण वर्ष सरते शेवटी निसर्ग राजा ने कृपा केली आणि आमराई बहरली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. उभयता असलेल्या आंब्याच्या वृक्षा कडे बघून तरी वाटते.
आंब्याला मोहर जरी दिसत असला तरी आलेला मोहर टिकेल किती आणि यातून फळधारणा होईल किती हे सुद्धा तितकेच महत्वाचे.आणि यातून फळ झाडाला किती टिकेल याची सुद्धा साशकंता आहे नैसर्गिक संकटाच्या मालिकेला सध्या सर्वच फळांना भाजीपाला यांना सामना करावा लागतो आहे. अंबा जरी बहरला असला तरी त्यांना सुद्धा अनेक नैसर्गिक आपत्तीला संकटाला सामोरे जावे लागणार वादळ गारपीट आणि मधून मधून येणारे धुके अशा विविध निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आंब्याला सुद्धा बसणार. निसर्ग राजा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा असा दगा फटका आंब्यास देईल का? असा प्रश्न आंबा उत्पादक शेतकऱ्यांना पडतो आहे. असं म्हणतात मानवाने दिलेल्या बाबीला मर्यादा असते पण निसर्गाची किमया अमर्याद असते. शेतकऱ्याच्या उपलब्ध असलेल्या झाडाला यावर्षी खूप छान बहर ला असून निसर्गानेच जणू काही आंब्याला फळाचा सम्राट अशी उपमा दिली असावी. पूर्वी ग्रामीण भागात गावाच्या आजूबाजूला आमराई असायची त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आंब्याचे काही वाटायचे नाही. परंतु कालांतराने वृक्षतोड माफियांकडून या फळाच्या झाडाची अतोनात कत्तल केली त्यामुळे चवीला गोड अशी असलेली आमराई नामशेष झाली त्यामुळे ग्रामीण भागातील आंब्याचे उत्पादन घटले. वर्तमान स्थिती बघता शेतकऱ्याकडे घरात खाण्यासाठी किंवा आल्या गेल्या यजमानांना देण्यासाठी ही आंबा नसतो ही शोकांतिका आहे. काही शेतकऱ्याकडे दोन-चार आंब्याची झाडे आहेत ते विकणार काय आणि घरी किती ठेवणार हा प्रश्न त्यांच्यासमोर आपसूकच उभा ठाकतो. त्यामुळे अशावेळी आंब्याचे भाव वाढलेले सुद्धा असू शकते. सध्या तरी आंब्याला मोहर दिसत असल्यामुळे निसर्ग राजा ची अवकृपा न राहता कृपादृष्टी करेल आणि लोणचे आमरस खायला मिळेल अशी आशा अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे. तसेच ग्रामीण भागात एक म्हण प्रसिद्ध आहे .आंबा पिकतो पाऊस पडतो आंबा पिकला की पर्जन्यमान जास्त होणार अशी एक भोळी भाबडी सुबक कल्पकता ग्रामीण भागात प्रचलित आहे. तेव्हा नक्कीच यावर्षी जुन्या मोटारगाडी थांबा असलेल्या परिसरात वेळूच्या विणलेल्या व त्यावर गवताने अच्छादित केलेले टोपले दिसतील त्यामध्ये केळ्या, शेप्या अशी नामांकित आंबे असतील.
