दिलीप कन्नाके यांच्या प्रयत्नाने अपंगाला मिळाली सायकल

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सामाजिक भान असणारे राजकारण करीत असतील तर समाजातील दुर्लक्षित घटक मदतीपासून वंचीत राहत नाही बोराटी येथील रोशन शंकर राउत (२३) हा दोन वर्षा पूर्वी आपल्या मित्रा सोबत माहूरला रेणूका मातेच्या दर्शनाला गेला होता परतांना त्याच्या दुचाकीचा अपघात झाला त्याच्या दोन्ही पाया चे आपरेशन करून रॉड टाकावे लागले . तेव्हा पासून तो चालत नव्हता त्याला वॉकर चा सहारा घेऊन चालाव लागत आहे गरिबीची परिस्थिती असल्याने दुसरा कुठला उपाय तो शोधू शकला नाही त्याच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाके यांना माहिती मिळाली त्यांनी त्यांच्या वडिलांशी संपर्क साधून पंचायत समिती मधून तीन चाकी सायकलची व्यवस्था करून दिली आवश्यक असणारी कागदपत्रे पंचायत समितीला देऊन त्यांनी आज सायकल पंचायत समिती च्या आवारात रोशनला दिली रोशनच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता रोशनचे वडील शंकर राऊत यांनी दिलीप कन्नाके व मित्र मंडळाचे आभार मानले यावेळेस सायकल देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष (शरद पवारगट ) दिलीप कन्नाके नगरसेवक मंगेश राऊत , प्रहार पक्षाचे तालुकाप्रमुख संजय दुरबुडे गौतम तागडे रमेश पेंदाम प्रविण काकडे राजू रोहणकर मोहन खारकर नितीन कोमेरवार बबलू बहाळे पस चे वानखडे उपस्थीत होते .