
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२२-२३ अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी समीक्षा धाये, तेजस्विनी इंगोले , शृतम मिश्रा ,गौरव रंगे, दिव्या बर्मे, ओम चंद्रवंशी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शेततळ्याबद्दल माहिती दिली. सपाट ते कमी उताराच्या जमीनीवर शेततळ्याव्दारे पाणी साठवता येते. यासाठी मातीची खोली कमीत कमी २.५ ते ३ मी. किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. शेततळ्यातील पाण्याचा बाष्पीभवनाव्दारे होणारा ह्रास कमी करण्याकरिता शेततळ्याच्या बांधीची ऊंची जमीनीपासून २ ते २.५ मी ठेवावी. ज्या ठिकाणी पाणी झिरपण्याचा वेग जास्त आहे अशा ठिकाणी तळयाच्या सर्व बाजूचे व तळाचे पॉलिथीन फिल्मने अस्तीकरण करून घ्यावे. शेततळ्याचा उपयोग अवर्धन काळात जलसिंचनासाठी व मत्स्यपालनासाठी करू शकतो असे सांगितले . हे प्रात्यक्षिक करताना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य एम. व्ही. कडू, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. व्ही. महानुर, विषयतज्ज्ञ कृषी अभियांत्रिकी प्रा. ए. डी. उत्खेडे या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
