
प्रवीण जोशी: प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी आणि निंगणू र महसूल मंडळात येणाऱ्या सर्व च गावातील शेतकऱ्यांनी आता आकाशाकडे पाहायला लागले आहे गेले अठरा दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे आधी पेरणी च्या वेळेला पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार तिबार पेरणी चे संकट ओढवले होते त्यामधून कसेबसे शेतकरी सावरले तर नंतर जुलै मध्ये सतत च्या पावसाने तर अक्षरषा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते सतत पडलेल्या पावसाने पिकाची वाढ खुंटली.आता हलक्या ते मध्यम सामू असलेल्या जमिनीला पाण्याची नितांत गरज आहे शिवाय सोयाबीनच्या शेंगा सुद्धा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे तेव्हा निसर्ग राजा मात्र रुसून बसल्याचे चित्र आहे . तसेच पिकामध्ये तण मोठ्या प्रमाणात वाढले होते डवरणी फवारणी सह सर्व च कामे बंद होते त्यानंतर कसे तरी पावसाने उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांनी शेतातील सर्व कामे आटोपून घेतली मात्र आता पिकाला मोठ्या प्रमाणात पावसाची गरज असल्याने गेले अठरा दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत असल्याचे चित्र सध्या परीसरात पाहायला मिळत आहे.
