“यशदा “पुणे चे पंचायत राज प्रशिक्षण केंद्र पुसद यांची कीन्ही जवादे ग्रामपंचायत येथे भेट

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी यांचे राळेगाव येथे जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन संदर्भात प्रशिक्षण सुरू आहे.
यशदा पुणे चे पंचायत राज प्रशिक्षण केंद्र पुसद चे वतीने प्रशिक्षणार्थींना क्षेत्र भेटी करीता राळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे ग्रामपंचायत येथे, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन चे काम पाहण्यासाठी आणुन, त्यांना कामाविषयी माहिती देण्यात आली.’हर घर जल ‘व सार्वजनिक स्वच्छता पाहून प्रशिक्षणार्थी,व अधिकार्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी सरपंच सुधीर जवादे पाटील” यशदा “चे प्रशिक्षक विवेक गोगटे,रिता ठवकर,सुदाम पवार,उप अभियंता आलोक शर्मा, राहुल हरिणखेडे, उपसरपंच रमेश तलांडे, उमेद बचत गटाच्या दुर्गा वडते, प्रियंका उईके, आशा वर्कर सुशिला मेश्राम, सेतू सुविधा केंद्राचे राजु मुंडाली, ग्रामपंचायत कर्मचारी पुंडलीक लोणबले, मारुती विठाळे,व नागरिक उपस्थित होते.