क्रीडा संकुल राळेगाव येथे हॅन्ड बॉल स्पर्धा घेऊन स्वातंत्र्यदिन साजरा [एक दिवशीय मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम ]

राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)

राजीव गांधी क्रीडा संकुल राळेगाव येथे एक दिवशीय मित्र परिवाराच्या वतीने हॅन्ड बॉल चे सामने घेऊन स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला.क्रीडा संस्कृती ला चालना देण्यासाठी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेत यवतमाळ टीम ने 35गोल तर राळेगाव टीम ने 40गोल केले. राळेगाव टीम चा 5गोल विजय झाला .या वेळी सागरभाऊ जुमनाके फुटबॉल कोच यांनी बोलताना सांगितले की 15 वेळा शासकीय खेळाडू कर्मचारी नॅशनल मध्ये लागलेले आहेत. 70 खेळाडू राज्यस्तरावर खेळलेले आहे. 15 वेळा राळेगाव मुलीच्या टीमचे वर्चस्व केले आहेत. व क्रीडा संकुल मध्ये 80 ते 100 खेळाडू दररोज सराव करत आहे. उपस्तिथ मान्यवर भारतीय जनता पार्टी राळेगाव शहर अध्यक्ष डॉक्टर कुणालभाऊ भोयर, डॉक्टर शैलेशजी बर्वे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागरभाऊ वर्मा, विनायकभाऊ महाजन, आकाशभाऊ कुरसंगे, शैलेशभाऊ कांबळे, अनिलभाऊ मस्के, सागरभाऊ पेंटर राळेगाव कोच, संदेशभाऊ जोगळेकर यवतमाळ कोच,चेतनबाबु वर्मा उपस्थित होते.