
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
मानव कल्याणाचा मार्ग कुरानात आहे यामुळे कुराण वाचून समजून घेऊन त्यानुसार वागावे आचरण करावे आणि तरुणांना मुलांना चांगले शिक्षण व योग्य संस्कार देण्याचा प्रयत्न करा असे आवाहन अनेक नमाजला अदा करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठांनी यावेळी तरुणांना मार्गदर्शन करताना उपदेश पर सांगितले
गुरवारी रमजान ईद निमित्त ढाणकी शहरातील मुख्य असलेल्या जामा मस्जिद मध्ये ठरलेल्या वेळेनुसार सार्वजनिक नमाज अदा करण्यात आली एकमेकांचे दुःख समजून घेणे, एकमेकांना मदत करणे, मदत करताना जात, धर्म ,पंथ ,न बघता केवळ मानव धर्म समजून मदत करा असे सुद्धा यावेळी उपस्थित असलेल्या इमाम साहेबांनी सांगितले संकटाशी लढायला शिका प्रयत्न करा ऊपरवाला तुमच्या मदत तिला नक्की धावून येईल व तसेच आपल्या मनात कसलाही द्वेष, कलह , सैतानी अवगुण बाळगु नका, व ईतर धर्मियाचा मानसन्मान करा,व लहान मुलावरून तरुणांवर चांगले संस्कार करा यावेळी अनेक तरुणांनी जेष्ठांनी नमाज पठनासाठी ईदगाह मध्ये गर्दी केली होती .नमाज पठनानंतर उपस्थित बांधवांनी एकमेकांना हस्तांदोलन व गळाभेट करून रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या नमाज पठनानंतर काहींनी दानधर्म पाळला लहान मुले आणि तरुण यांचे खास गणवेशा मध्ये आगमन झाले होते. मनभेद व मतभेद कटुता न ठेवता हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत सण उत्साहात साजरा केला. यावेळी शहरात शांतता नांदावी यासाठी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता
