बेंबळा धरणाचे पाणी कालव्यातून उपसा करण्यासाठी डीझेल पंप सोबतच विद्युत पंपाचा वापर करण्याची परवानगी जिल्हा अधिकारी व बेंबळा विभागाला निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

पाण्याचा विसर्ग बंद झाल्यावर, पाणी वाहून नदी नाल्यात जाउ नये म्हणून कालव्याचे शेवटचे टोक बंद करणे बाबत.बेंबळा धरणाच्या कालव्यातील पाणी उपसा करण्यासाठी,बेंबळा कालवे विभाग डीझेल पंपाची परवानगी देते. परंतु डिझेल इंजिन द्वारे ओलित करणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही, तेव्हा विद्युत पंपाची परवानगी देण्यात आल्यास शेतकरी महावितरण कंपनीकडून रितसर विद्युत कनेक्शन घेऊन पाणी उपसा/सींचन करु शकतो.
ही सुविधा उपलब्ध नसल्याने बेंबळा धरणाचे पाणी कालव्यातून वाहुन जाते, पाण्याचा अपव्यय होतो.सिंचनाचा उद्देश पूर्ण होत नाही.
धरणाचा विसर्ग बंद झाल्यावर कालव्यातील पाणी वाहून जाते, कारण कालव्याचे शेवटचे टोक बंद केल्या जात नाही.
कालव्याचे पाणी उपसा करण्यासाठी विद्युत पंपाची परवानगी द्यावी.
धरणाचे पाणी (विसर्ग) बंद झाल्यावर कालव्याचे शेवटचे टोक बंद करण्यात यावे.
सुधीरभाऊ रामदासबापु जवादे
बेंबळा कालवे शेतकरी संघर्ष समीती.