
आज डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांना मुभा आहे कारण बाबासाहेब तुमच्यामुळे आज आम्ही स्वाभिमानाने उभे आहोत आम्ही घेतो तो श्वास खातो ती भाकरी फक्त आणि फक्त तुमचेच देन आहे अशा भावनेतून वेडशी गावातील बौद्ध उपासक उपासिकाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य ६ डिसेंबर २०२२ रोज बुधवारला भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वेडशी येथील बौद्ध उपासक उपासिका यांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आले आहे . हे कॅन्डल मार्च गावातुन काढून शेवटी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या सभोवताल गोलाकार स्थितीत कँडल लावण्यात आली व त्यानंतर सर्व महिलांच्या उपस्थितीत भीम स्तुती धम्मपालन गाथा व सामूहिक बुद्ध वंदना घेऊन पंचशील त्रिशरण ग्रहण केले व बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील सर्व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
