
सहसंपादक:रामभाऊ भोयर
राळेगाव जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागणीसह इतरही मागण्यांकरिता रायगाव तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी 14 मार्चपासून होणाऱ्या बेमुदत संपात सक्रिय होत आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत मध्यवर्ती संघटना व इतर घटक संघटनांच्या मार्फत शासनाकडे चर्चा व निवेदन सादर करून प्रलंबित जिव्हाळ्याच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावे यासाठी प्रयत्न झाले परंतु जुनी पेन्शन योजना लागू करणे व इतर रस्ता मागणी आजपर्यंत मान्य न झाल्याने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ डी एन ए 132 व कर्मचारी समन्वय समिती मार्फत दिनांक 14/03/2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात येत आहे. सदर संपामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनए 136 तालुका राळेगाव मधील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी 14 मार्च 23 पासून होणाऱ्या बेमुदत संपात सक्रियपणे सहभागी होत आहे. यासंबंधीचे निवेदन गटविकास अधिकारी राळेगाव श्री मडावी साहेब यांना देण्यात आले. यावेळी ग्रामसेवक संघटना तालुका अध्यक्ष गजानन भोयर, सचिव मनोज पन्नासे, उपाध्यक्ष जगदीश मडावी, गाणार साहेब, प्रवीण निकोडे, मनीष वडे, राजेश ढगे, पंढरीनाथ खडसे, सुनील येंगडे, संतोष पटाईट,महिला प्रतिनिधी पिंगळे मॅडम, वडूले मॅडम, पाटील मॅडम, इत्यादींची उपस्थिती होती