राळेगाव नगरपंचायतच्या पाणी पुरवठा व विद्युत सहाय्यक कर्मचारी यांचे आमरण उपोषण सुरु ,सी ओ ची विवादित भूमिका?

सहसंपादक -रामभाऊ भोयर

नगरपंचायत राळेगाव अस्तित्वात येऊन आठ वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा नगरपंचायत प्रशासन समान समान वेतन या निर्णयानुसार कर्मचारी बांधवांना वेतनश्रेणी लागु करण्यास टाळाटाळ करित आहे.ग्रामपंचायतच्या काळापासून तोकड्या स्वरुपाच्या मानधनावर कर्मचारी काम करीत असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.
राळेगाव नगरपंचायत मध्ये काँगेस पक्षाचे बहुमत असून सुद्धा पाणी पुरवठा विभाग आणि विद्युत विभाग अत्यावश्यक सेवेमध्ये येतो, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गावर अन्याय होत आहे किती मोठी शोकांतिका आहे. उन्हाची दाहकता लक्षात घेऊन उपोषण मंडपातील कर्मचारी वर्गाचे समान काम समान वेतन आयोगा नुसार वेतन वाढ लागु करावी हिच आग्रहाची मागणी मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांना केली परंतु त्यांनीही कर्मचाऱ्यांचा मागण्याकडे दुर्लक्ष केले. सी ओ कोणताही निर्णय त्वरित घेत नाही त्यामुळे छोट्या छोट्या समस्या उग्र स्वरुप धारण करत आहे.
त्यामुळे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आल्याचे उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.