
राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे ठाणेदार विजय महाले यांच्या विनंतीवरून स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथे बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी अवधूत वाडी पोलीस स्टेशन यवतमाळ येथे कार्यरत असलेले सुखदेव भोरखडे हे रुजू झाले आहे. सविस्तर वृत्त असे विजय महाले हे दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी वडकी येथे ठाणेदार म्हणून रुजू झाले होते. ते रुजू होताच त्यांनी परिसरातील अवैध धंदे व गुन्हेगारांना चांगलेच बजावले होते तर मागील दीड वर्षापासून वडकी पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून कार्यरत असताना त्यांचे काळात अवैध धंद्यावर अंकुश लावण्यात आला होता. विशेष म्हणजे अवैध जनावर वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाया करून दीड वर्षाच्या कार्यकाळात २५१ जनावरांना जीवदान दिले आहे.तर जबरी चोरीचे गुन्हेही विजय महाले यांनी तात्काळ उघड केले. तर विशेष म्हणजे महामानव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राळेगाव तालुक्यातील खैरी येथे 20 ते 22 वर्षापासून जातीय दंगल मुळे साजरी करणं बंद होती. परंतु विजय महाले वडकी पोलीस स्टेशनला रुजू होताच त्यांनी त्या गावांमध्ये स्वतः पुढाकार घेऊन एक शांतता कमिटी नेमून त्या गावांमध्ये नव्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे सुरू केली आहे.तर महाले यांचें परिसरात ठाणेदार म्हणून चांगलीच दहशत पसरली होती त्यांच्या दहशतीमुळे त्यांचे कार्यकाळात खून, दरोडा यासारखे गुन्हे घडले नाहीत.तर परिसरात जातीय तणाव निर्माण झाला नाही. विजय महाले यांनी आमच्या प्रतिनिधीशी शी बोलताना असे सांगितले की माझा दीड वर्षाचा कार्यकाळ हा वडकी पोलीस स्टेशन मध्ये चांगल्या पद्धतीने गेला असून विधानसभा मतदार संघात व पांढरकवडा उपविभागात मी मागील तीन वर्षांपासून कार्यरत आहे त्यामुळे मी स्वतः होऊन विनंती बदली करून घेतली आहे. वडकी सह परिसरातील नागरिकांनी मला सहकार्य केल्याबद्दल मी वडकी सह परिसरातील नागरिकांचे मनापासून आभार मानतो आणि नव्याने रुजू झालेले ठाणेदार सुखदेव भोरखडे यांना शुभेच्छा देतो, असे सांगितले आहे.
