राळेगाव मतदार संघात आता धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा उबाळा मेजर जीवन कोवेच्या रूपात

सहसंपादक : रामभाऊ भोयर

77 राळेगाव विधानसभा मतदार संघात सध्या धनशक्तीचे प्रदर्शन सुरू आहे पण एक असाही उमेदवार आहे ज्यांचे कडे धन नसून मना मनात घर करून बसले ते अंतरगावचे सुपुत्र देशाचे सैनिक मेजर जीवन कोवे यांचे राळेगाव मतदार संघात एक वेगळेच लक्ष दिसत आहे आणि ते म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती.
मेजर जीवन कोवे हे एक मेहनती व गरीब कुटुंबातील सदस्य असल्याने परस्थितीशी झुंज देतं जीवन जगले. देश सेवे सोबतच समाजसेवा करत ते निवृत झाले नंतर सातत्याने कार्यशील आणि निर्भयपणे आपले काम करत जनसंपर्क आणि मतदारास जागरूकता निर्माण करून जनशक्ती एकत्रित करण्याचे काम सहा महिने अगोदर पासून सुरू केले त्यांचे कार्य सेवानिवृत्त नंतर प्रकाशमय झाले आणि संपर्काच्या माध्यमातून 442 गावां पैकी लगभग 370 गाव त्यांनी पिंजून काढले आजपर्यंत कोणताही उमेदवार 370 गावात मतदाराच्या दरवाज्यात पोहोचला नाही पण त्यांनी सतत गेल्या सहा महिन्यापासून 1.5 लाख परिचय परिपत्रक स्वतः दारा दारात पोहचून आपली अलगच ओळख जनतेला दिली. त्यामुळे आता विधानसभा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झाली आहे..
त्यांच्या कुठल्याही सभा नाही की, रॅली नाही. फक्त कॉर्नर बैठका व भेटीगाठी घेत बिना सफेद कॉलर आणि खादी कॉलर वाल्यांचा सहारा न घेता मतदारच आपले कार्यकर्ते हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून दोन चार माजी सैनिक सोबत घेऊन ते गावागावात प्रख्यात झाले शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव, बेरोजगारांना काम, महिलांना सुरक्षा, स्वच्छ पिण्याचे पाणी, गाव खेड्यात शिक्षणाचा दर्जा, पाड्याकडे जाणारे रस्ते आणि त्यांच्या घराची अवस्था ह्या मुद्यावर मत मागत त्यांनी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती मोहीम राबविली. विद्यार्थ्यांकरिता अकॅडमी आणि सुशिक्षिता करिता रोजगार कष्टकऱ्यांच्या हाताला काम, ऐवद्य धंदे, गुन्हेगारी आणि युवकांमध्ये नशेचे प्रमाण ह्यावर विशेष भर देवू असे आश्वासन देत शेत मालाला हमीभाव आणि GST मुक्त शेतिचे संसाधन झालेच पाहिजे अशी प्रतिज्ञा करून कंबर कसणारे माजी सैनिक एकमेव उमेदवार आहे. गोंडवाना गणतंत्र पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आरी चिन्हावर राळेगाव विधान सभा मतदार संघात त्रिकोणी लढत देण्यास जनशक्तीचा अवलंब करत धनशक्तीला परास्त करण्याचा विडा भारतीय अर्थ सैनिक बल माजी सैनिक कल्याण संघटना यांनी उचलला आहे जनता नक्कीच प्रतिसाद देईल असे म्हणणे माजी सैनिक व त्यांच्या समर्थकांच्या तोंडून ऐकण्यात येत आहे.. बाकी जनता जनार्दन आहे उमेदवाराचे वर्तन ह्याचा विचार पूर्वक विचार करूनच आपले व आपल्या मुलाचे भविष्य उज्वल करण्यासाठी जनशक्ति धनशक्तीच्या विरुद्ध एकवटली आहे असे वातावरण ग्रामीण भागात दिसत आहे..