हिंगणघाट,वडकी ते वडनेर व राळेगांव रोडवरती नविन ट्रॅव्हल्स वर बंदी घाला, ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ ,राष्ट्रवादी वाहतूक सेलचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन…

हिंगणघाट:- हिंगणघाट ते वडकी, वडनेर व राळेगांव रोडवरती नविन ट्रॅव्हल्स सुरु होत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी वाहतूक सेलचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन..
हिंगणघाट ते वडकी, वडनेर, राळेगांव रोड वरती हल्ली १०० ते १५० ऑटो चालत आहे. परंतु उद्या जावून जर या रोडवरती नविन ट्रॅव्हल्स सुरु होत आहे तर सर्व ऑटो चालकांवर व कुटूंबावर उपासमारीची वेळ येईल. कुटूंबाचा उदरनिर्वाह ऑटो पॅसेंजर वर अवलंबून आहे. त्यातच असे झाले तर आम्ही पूर्णपणे रत्स्यावर येवू. त्यातच ट्रॅव्हल्स चालक ऑटो चालकावर मुजोरपणे सांगतात की, मी या रोडवर ट्रॅव्हल्स चालविणार येणाख्या काही दिवसातच ट्रॅव्हल्स सुरु करण्याचा आत आपण स्वतः पुढाकार घेवून ट्रॅव्हल्स व चालकावर आळा घाला जेणेकरुन आम्हां सर्व ऑटो चालकावर उपासमारीची वेळ येणार नाही असे निवेदन राष्ट्रवादी वाहतूक काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, उपाध्यक्ष अन्सार शेख, विधानसभा अध्यक्ष हेमंत घोडे, जिल्हा सरचिटणीस जितू रघाटाटे, तालुका अध्यक्ष संजय गांभुळे, शहर अध्यक्ष अमोल भिषेकर, तालुका उपाध्यक्ष रुषीकेश मेश्राम, सचिव सुनील घोडखांडे, नरेश भगत, किशोर चव्हाण, इमरान शेख, बालु राऊत, पंकज राऊत, नाना ताटेवार आदी उपस्थित होते..