धक्कादायक:यवतमाळ येथे शिकाऊ डॉक्टर च्या खुनाने विद्यार्थी आक्रमक

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

मूळचा ठाणे जिल्ह्यातील असलेल्या आणि एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या अशोक पाल या विद्यार्थ्याची यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात हत्या करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली असून हत्येचे नेमके कारण काय हे अद्याप अद्याप समजू शकलेले नाही.
या घटनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थी संतप्त झाले आणि आंदोलन सुरू केलं आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपास सुरू केलाय.यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. अशोक पाल मागील काही दिवसांपासून शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होते. हत्या प्रकरणानंतर रुग्णालय परिसरात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाविद्यालय प्रशासन व डीनविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं सुरू असून सर्वत्र खळबळ उडाली आहे

हि घटना दि.10/नोव्हेबर/2021 रोजी रात्रि 8 वाजताच्या सुमारास डॉक्टर अशोक पाल नामक शिकाऊ डॉक्टर चा अज्ञात व्यक्ति कडून खून करण्यात आला व मारेकरी पसार झाल्याची घटना परिसरात घडली या घटनेची माहिती कर्मच्याऱ्याना मिळताच ते घटना स्थळी पोहचले त्याच क्षणी रुग्नालयाचे कर्मच्याऱ्यानी खाजगी रुग्नवाहिका चालकास माहिती दिली माहिती मिळताच रुग्नवाहिका चालकाने घटनास्थळावरुन जख्मी डॉक्टरला उचलून उपचारासाठी डॉक्टरांच्या स्वाधीन केले डॉक्टरांच्या अथांग प्रयत्नाला यश आले नाही आणि शिकाऊ डॉक्टरला मृत घोषित केले या खुनाने मेडिकल कॉलेज च्या सर्व शिकाऊ डॉक्टरांनी आज रोजी आक्रमक पने संप पुकारला या संपा मुळे रुग्नांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.शिकाऊ डॉक्टरांनी मेडिकल कॉलेजचे चे सर्व गेट बंद करुण रुग्नांना वेटिस धरले आहे.कोणत्याही रुग्णाला आतमधे येण्यास प्रवेश बंद केला व डीन राजनामा द्या एस पी.कलेक्टर राजेनामा द्या अश्या घोषणा बाजी करत मागण्या करित नारे बाजी करने सुरु केले डॉक्टरांच्या मागण्या सर्व सामान्यांच्या जिवारी बेतणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे परंतु डॉक्टर आपल्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी रुग्नांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे.डॉक्टर विसरत आहे.की एका मुळे आपन हजारो निर्दोष व गरीब रुग्नांचा बळी घेत आहो या रुग्णालयात ना कुणी आत ना कुणी बाहेर पडत आहे अनेकांचे प्राण संकटात आले असुन या प्रकरणी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रुग्णाच्या प्राणाची रक्षा करण्यात यावी अशी मागणी जनते कडून करण्यात येत आहे.