
सहसंपादक : रामभाऊ भोयर
श्री विवेकानंद विचार मंच राळेगाव यांचे वतीने श्री स्वामी विवेकानंद जयंती प्रित्यर्थ आणि वंदे मातरम या स्वातंत्र्य लढ्यातील मंत्राला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करून दीडशे युनिट रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे
दिनांक 11 जानेवारी रोज रविवारला हे रक्तदान शिबिर ग्रामीण विकास प्रकल्प राळेगाव येथे सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार असून या रक्तदान शिबिरासाठी यवतमाळ अर्बन बँक बँकेचे सहकार्य लाभले आहे रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी मेघशामचांदे, ऍड मोहन देशमुख,पुरुषोत्तम मेंडुलकर,गुड्डू पटेलपैक, आणि त्यांचे सहकारी कठोर परिश्रम करीत आहेत राळेगाव परिसरातील सर्व तरुण मित्रांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन मंचाच्या संकल्पपूर्तीसाठी हातभार लावावा असे आवाहन मंचाचे अध्यक्ष प्राचार्य मोहन देशमुख यांनी केलेले आहे
