
ढाणकी प्रतिनिधी:प्रवीण जोशी
गेल्या दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या टेम्बेश्वर नगर येथील प्रभाग 8मधील नालीचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. स्वीकृत नगरसेवक संजय सलेवाड यांनी स्वतः पुढाकार घेत या नालीला वाट करून दिल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या नालीच्या प्रवाहावरून स्थानिक पातळीवर वाद सुरू होता. नाली तुंबल्याने आणि पाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती, तसेच आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. अनेक प्रयत्न करूनही हा वाद सुटत नव्हता.
नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्वीकृत नगरसेवक संजय सलेवाड यांनी या विषयात मध्यस्थी केली. त्यांनी केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामाला सुरुवात केली . तांत्रिक अडचणी दूर करून आणि वादावर तोडगा काढून नालीचा मार्ग मोकळा करण्यात आला यावेळी प्रभाग 7 चे नगरसेवक रवी ढोबळे व प्रभाग8 चे नगरसेवक प्रतिनिधी इम्रान शेख उपस्थित होते.
या कामामुळे परिसरातील साचलेल्या पाण्याचा निचरा झाला असून, पावसाळ्यात निर्माण होणारी भीती आता दूर झाली आहे. लोकप्रतिनिधीने दाखवलेल्या या कार्यतत्परतेबद्दल टेंभेश्वर नगर येथील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
