
वाहनचालकाच्या समयसुचकतेनी जीवीतहानी टळली

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा:- तालुक्यातील बोर्डा बोरकर गावाजवळ आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास तनीस भरलेली पिकअप क्रमांक एम एच ३४ बिजी ८९३५ रस्त्याच्या कडेला ऊभी असतांना अचानक विद्यूत ताराचा स्पर्श झाला आणि वाहणाने पेट घेतला मात्र वाहण चालकानी समय सुचकता दाखवत पेट घेतलेली वाहन जवळच असलेल्या तलावात टाकली आणि मोठी जीवीतहानी टळली सदर वाहन सौरभ कोहळे कवडजी यांच्या मालकीची असून तो स्वताच वाहन चालवीत होता अग्नीशामक विभाग पोंभूर्णा ची वाहन वेळेवर घटणास्थळी उपस्थीत झाल्याने आग आटोक्यात आणली….
