हिरवाईने नटला लखमाई माता मंदिर गड

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जळका (मामासाहेब) येथील लखमाई माता मंदिर डोंगरावर असून हा लखमाई माता मंदिरचा डोंगर भाग हिरवळीने नटला आहे.
पोळ्याच्या पाडवेला लखमाई मातेच्या दर्शनासाठी गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील भाविकभक्त मातेच्या दर्शनासाठी येत असतात दरवर्षी मंदिर गडावर एक दिवसाची जत्रा भरली जाते.
या यात्रेला परिसरातील भाविक भक्त येथे देवीच्या दर्शनासाठी व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गडावर येत असतात
लखमाई माता मंदिराचा डोंगर भाग हिरवळीने नटला आहे याठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हा परिसर आकर्षित करणारा आहे. गेल्या काही दिवसापासून पाऊस समाधानकारक असून पावसाने लखमाई माता मंदिर डोंगर परिसर हा झाडे झुडपे हिरवेगार झाले आहे त्यामुळे हा गड भाविकांना आकर्षित करणारा असला तरी देवीच्या दर्शनासाठी गावातील लहान मुला पासून तर महिला वयोवृद्ध पायी जावून निसर्गाचा आनंद घेतात.