खासदार भावना ताई गवळी (पाटील) यांचे कडून कळंब शहरात नऊ बोअरवेल ची राखी निमित्त भेट

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

कळंब येथे दि. २२ ऑगस्ट 2021 रोजी खासदार भावनाताई गवळी (पाटील) यांनी राखी सन निमित्त कळंब वासियांना आवश्यकता त्या ठिकाणी बोअरवेल भेट दिली. कळंब येथे एकूण नऊ बोअरवेल भावनाताई गवळी (पाटील) यांच्या फंडातून देण्यात आली आहे . यामध्ये प्रभाग क्रमांक 03 मध्ये उद्घाटन सोहळा पार पडले. या कार्यक्रमाचे वेळी शिवसेना चे उप जिल्हाप्रमुख दिगंबरभाऊ मस्के, तालुकाप्रमुख निलेशभाऊ मेत्रे, शहर प्रमुख रोशणभाऊ गोरे, उप शहरप्रमुख आकाशभाऊ कुटेमाटे , हुसेन कान्हके, शिरे काका, गजानन मेश्राम, मनोज मेश्राम,अशोक चौधरी, प्रमोदराव जरोदे, देवराव डुडूरक ,अक्षय मडावी , आशिष कन्हाके , अजय कन्हाके , दत्ताजी काळे, विनोद आसुटकर, अनिल जरोदे आदी उपस्थित होते.