
प्रतिनिधी: प्रवीण जोशी,ढानकी
सध्या राज्यात एकच अफवा चालू आहे ती म्हणजे मुले पळवणाऱ्या टोळीची. राज्यात तसेच जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून व जनतेतून मुले पळवणारी व शरीराचे अवयव काढून विकणारी टोळी आल्या बाबत अफवा पसरण्यात येत आहे. अशीच अफवा ढाणकी इथून जवळच असलेल्या मोरचंडी या गावी पसरवण्यात आली होती. त्या आफवेची शहानिशा करण्यासाठी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप बोस साहेब यांनी स्वतः जाऊन चौकशी केली. त्यात असे निदर्शनास आले की, आश्विन वसंता राठोड यांची क्रुझर असून ती शाळेतील विद्यार्थ्यांना ने आण करत असतात. ते शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना. काही विद्यार्थिनींनी हे पाहिले व पाहून संशय व्यक्त केला की, ही मुले पळविणारी टोळी आहे. यामुळे ढाणकी व आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते व अफवांना उधाण आले होते .या सर्व बाबी कडे लक्ष देऊन ठाणेदार प्रताप बोस साहेब यांनी जनतेस असे आवाहन केले की ,अफवांवर विश्वास ठेवू नये व असे काही निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क करावा.पोलीस प्रशासन सज असून आपली मदत करण्यात येईल. सद्या यवतमाळ जिल्ह्यात असा काही प्रकार नसून अफवांवर विश्वास ठेवू नये व सतर्क रहावे.
