
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महीला व बालविकास विभाग, महात्मा गांधीं प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण संस्था पुणे जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यवतमाळ, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, पंचायत समिती राळेगाव येथील सभागृहात बालकांचे कायदे विषयक गाव बाल संरक्षण समिती यांची कार्यशाळा दिनांक १८ ऑगस्ट २५ रोजी आयोजित करण्यात आली होती, या कार्यशाळेला श्री.अरूणजी भगत नायब तहसीलदार राळेगाव हे अध्यक्षस्थानी होते, तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री योगेशकुमार दंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक राळेगाव,श्री सागर विठाळकर बाल विकास प्रकल्प अधिकारी, श्री देवेंद्र राजुरकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी,मार्गदर्शक अरूण कांबळे, महेश हळदे, फाल्गुन पालकर, पर्यवेक्षिका स्नेहा अनपट, धरती कोराम, पायल आत्राम, अविनाश पिसुरडे, मोहन भोरे, मोहन मेघावत उपस्थित होते, सर्व मान्यवरांनी राजमाता जिजाऊ माता यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली, सर्व मान्यवरांनी बालकांचे कायदे विषयावर मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश पिसुरडे यांनी तर उत्कृष्ट सूत्रसंचालन कल्पना महाकुलकर यांनी केले, प्रशिक्षणासाठी शंभर अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. भोजनानंतर कार्यशाळेची दुसरे सत्र घेऊन कार्यशाळा समाप्त करण्यात आली.
