उभ्या बसला दुचाकीची धडक एक महिला ठार तर दोन जखमी


राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील घटना
सविस्तर वृत्त असे एम.एच.०६ एस.८८२५ ही बस राळेगाव वरुन वाढोणा बाजार मार्गे वणीला जाते वेळी वाढोणा बाजार येथे पॅसेंजर उतरविण्यासाठी थांबली असता अचानक मागून येणारी दुचाकी. दुचाकी क्रमांक एम.एच.३४ एच. ८९६६ या दु चाकीने उभ्या बसला जबर धडक दिल्याने एक महिला ठार व दोन गंभीर जखमी झाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात मरण पावलेली महिला कमलाबाई मारोतराव पोहनकर वय 65 वर्ष राहणार वाढोणा बाजार व गंभीर जखमी झालेले ताई सोनवणे वय 62 वर्ष तर दु चाकी चालक सुजल सोनवणे वय १६ वर्ष हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते या घटनेची माहिती वडकी पोलिसांना मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांच्या सह ठाण्यातील काही कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून सदर या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे