

सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील शेतातील वीजपुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर जळालेले असल्यामुळे ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यात यावे याकरिता रिधोरा येथील गावकऱ्यांनी दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोज बुधवार ला वीज महावितरण कार्यालय वडकी येथे शाखा अभियंता यांना निवेदन दिले आहे
या महावितरण कार्यालयाच्या गलथान
कारभारामुळे वीज बिल भरून देखील जळालेले ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यास अधिकाऱ्याकडून चालढकल होत असल्यामुळे रिधोरा गावातील असंख्य शेतकऱ्यांनी वीज महावितरण कार्यालय वडकी धडक दिली . यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांनी दिनांक २५ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर जळले होते याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तोंडी व लेखी विनंती अर्ज सादर केले होते परंतु अद्याप पर्यंत जळलेले ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यात आलेले नाही त्या ट्रांसफार्मर वरून शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा होत होता मात्र ट्रांसफार्मर जळल्यामुळे शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच आता काही दिवसांनी पिकाला पाणी देण्याची गरज भासणार असल्याने जर ट्रान्सफॉर्मर बदलून न दिल्यास शेतकऱ्यांना ओलीताची समस्या निर्माण होणार व पाण्याअभावी पिकांना हानी झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार वडकी वीजमहावितरण विभाग राहील अन्यथा चार दिवसात बंद असलेले ट्रान्सफॉर्मर बदलून नवीन ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलू न दिल्यास रिधोरा गावातील समस्त शेतकरी वीज महावितरण कार्यालय वडकी समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून केला आहे निवेदन देतेवेळी सरपंच उमेश गौरकार ,रामेश्वर कोकाटे, दीपक पवार ,हिरालाल काळे, चिंदजी वाडी सागर निरगुडवार, निळकंठ पोतराजे विशाल चौधरी, महादेव गाऊत्रे, विष्णू महाजन ,विठ्ठल गुरनुले, हनुमान शेंडे, संकेत बोरुले, उत्कर्ष बोरुले,शुभम येरणे गजानन शेंडे ललित कुंमरे आदी शेतकरी उपस्थित होते.
