
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक पदाच्या १७ जागांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडली. त्यात माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके व प्रफुल्ल मानकर अध्यक्ष जिल्हा काँग्रेस यवतमाळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने यवतमाळ नांदेड गटातील दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. हा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
या-ना-त्या कारणाने आदिवासी विकास महामंडळ संचालकांची पंचवार्षिक निवडणूक लांबल्याने गेल्यावेळी पाच वर्षासाठी निवडून दिलेल्या संचालकांनी तब्बल १७ वर्षे कारभार बघितला. एवढ्या अवधीनंतर झालेल्या या निवडणुकीत त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाल्याचे बघावयास मिळाले, मातब्बर उमेदवार व नेत्यांची प्रतिष्ठा त्यामुळे पष्णास लागली होती.
महामंडळाच्या यवतमाळ नांदेड जिल्ह्यातील एक जागांसाठी चार उमेदवार रिंगणात होते व यामध्ये काँग्रेस पक्षाचे अशोक मंगाम, भाजपाचे किशोर सलामे व किरण कुमरे यांच्या पक्ष समर्पित पॅनेल्स एकमेकांच्या
विरोधात उभे होते. एकंदरीत या निवडणुकीत 102 मते होती त्यापैकी काँग्रेसचे अशोक मंगाम यांना ४२ मते मिळाली, किरण कुमरे यांना ३९ मते व आदीवासी विकास मंत्री यांच्या भाजपा चे किशोर सलामे यांना १८ मते मिळाली म्हणून या निवडणुकीत किरण कुमरे व किशोर सलामे याचा या निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे.
सदर निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे कळंब बाजार समितीचे उपसभापती महादेव काळे, माजी उपसभापती गजानन पंचबुद्धे, आशिष मानकर, जगन्नाथ गेडाम, गंगाराम सलाम, गणपत मडावी, बळवंत नैताम, बाळाभाऊ नित, सुखदेव चावरे, चंद गौरकार, अनिल घोटेकर आदी लोकांनी परिश्रम घेतले.
