
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पोळा हा शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा सण.या दिवशी शेतकरी बारा महिने शेतीत काबाडकष्ट करणाऱ्या बैलाला विश्रांती देणारा सण.या दिवशी शेतकरी आपल्या बैलाला सकाळी पाण्यानी स्वच्छ धुवून पुसून स्वच्छ करतात.आणि बैलाची छान सजावट करतात आणि घरून मारोतीच्या पारावर नेऊन पुजा करुन परत पोळा संपला की घरी आणून शेतकरी आपल्या बैलाची पूजा करून बैलांना नमस्कार करतात आणि पुरणपोळी खायला देतात.अशा या सणाबाबत सांगायचं झालं तर राळेगाव तालुक्यातील येवती येथील सती सोना माता डोमाघाट येथे सुद्धा दरवर्षी पोळा भरविण्यात येतो.त्याप्रमाणे यावर्षी सुध्दा पोळा भरविण्यात आला.शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे बैलाला सजवून पोळ्याच्या ठिकाणी आणले होते.पण तेथील सर्व शेतकऱ्यांच्या बैला सोबत एका शेतकऱ्यांची बैलजोडी सुद्धा पोळ्यात आणली होती मात्र ती तेथील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.याचं कारण असं की त्या शेतकऱ्यांच्या एका बैलाच्या पोटावर 1500 रूपये लिहिले होते तर दुसऱ्या बैलाच्या पोटावर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना असं लिहीलं होतं.या शेतकऱ्यांना या द्वारे शासनकर्त्याना कदाचित असा संदेश द्यायचा असावा की बहिणींचं झालं आता भाऊजीचं काय.बहिणीला पंधराशे रुपये देऊन बहिण आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करू शकते का, या पेक्षा भाऊजीच्या शेतमालाला योग्य भाव दिला तर मुख्यमंत्री साहेब बहिणीची काळजी करण्याची गरज नाही.व्यवस्थित शेतमालाला भाव दिला तर आणि ज्या बहिणी भुमिहिन आहे त्याच्या पतीला रोजगार द्या असं असेल तर तुमचे भाऊजी पण बहिणीला जगवायला सक्षम असल्याचा संदेश या बैलाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांने शासनाच्या प्रतिनिधींना दिला तर नाही ना असा प्रश्न उपस्थित लोकांमध्ये दिसून येत होता.
