

सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिलायन्स फौंडेशन यांच्या अर्थसहयाने जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पिपंळखुटी येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करून जल दिवस साजरा करण्यात आलाआहे.
यावेळी जितेंद्र चौधरी रिलायन्स फौंडेशन महाराष्ट्र समन्वयक,योगेश तोतरे जिल्हा समन्वयक,नितिन नार्लावार संचालक जनसेवा प्रतिष्ठान यवतमाळ,संदीप वायाळ जिल्हा समनव्यक व समस्त गावकरी गुरुदेव सेवा मंडळ, महिला बचत प्रतिनिधी ग्राम पंचायत पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
रिलायंस फौंडेशन व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने पिंपळखुटी या गावात स्मशानभूमीत ला तारकुंपण करून अनेक प्रकारचे ५०० वृक्ष लागवड करण्यात आले.व त्यांना पाणी देण्या साठी ड्रीप चि व्यवस्था करण्यात आली.
पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्याच्याशिवाय सजीव प्राणी, झाडे यांचा विनाश होईल. त्यामुळेच ‘जल है तो जीवन हे’ असे मानले जाते. आपल्या जीवनात म्हणूनच पाण्याचे महत्व मोठे आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, सर्व नैसर्गिक स्त्रोतांचा अतिवापर आणि शोषणामुळे मानवाला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. हे संकट भविष्यात आणखी वाढू शकते. पाणी हा सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने, पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार त्याची उपयुक्ततता याविषयी जागरूक करण्यासाठी दरवर्षी जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आपण सर्वांनी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे असे मत जितेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले
यावेळी गजानन श्रीरामजवार, अरुण कांबळे ,वैभव गणवीर व समस्त पिंपळखुटी येथील सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
