
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
समाजातील कष्टकरी, शेतकरी शेतमजूर, विद्यार्थी सह विविध क्षेत्रात लोकांच्या समस्या आहे त्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे वृत्तपत्राचे आहे, म्हणूनच ऋत्तपत्राला समाजाचा आरसा म्हणतात असे मत साप्ताहिक राळेगाव समाचार च्या 34 व्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले. पुढे बोलतांना हे कार्य 1992 पासून राळेगाव शहरातून प्रकाशित होणारे साप्ताहिक राळेगाव समाचार चे संस्थापक संपादक स्व. सलीम सागर आणि आज विद्यमान संपादक फिरोज लाखाणी अतिशय खंबीरपणे करीत आहे. यावेळी मंचावर प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मेहता, प्रमुख अतिथी म्हणून राळेगाव नगर पंचायत चे उपाध्यक्ष जानराव गिरी, राजू रोहणकर उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते सर्वप्रथम आद्य पत्रकार बाळ शाश्त्री जांभेकर माँ सरस्वती स्व. संपादक यांच्या प्रतिमेचेला मल्यार्पण दिपप्रज्वलन केले.
यावेळी राजू रोहणकर यांनी आपल्या मनोगतातून दर्जेदार साहित्य, कविता लेख हे समजप्रबोधनाचे कार्य आहे. मात्र त्याला उत्कृष्ट सजावटीत दिवाळी अंकातून प्रकाशित करून समाजापर्यंत पोहचविण्याचं कार्य हे विविध वर्तमान पत्राचे निघणारे दिवाळी अंक करीत असते. ते काम अतिशय कसोसीने, जिद्दीने, चिकाटीने साप्ताहिक राळेगाव समाचार चा दरवर्षी चा दिवाळी अंक करीत असते. परंतु हे कार्य करीत असतांना संपादकाला तारेवरची कसरत करावी लागते हे मी पत्रकार म्हणून समजू शकतो असे मत राजू रोहणकर यांनी मांडले.
अध्यक्ष प्रकाश मेहता यांनी राळेगाव समाचार ला शुभेच्छा देऊन राळेगाव समाचार ला पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित केले.
यावेळी कार्यक्रमाला नगरसेवक शशिकांत धुमाळ, काँग्रेस शहर अध्यक्ष प्रदिप ठुणे, ऍड. किशोर मांडवकर, प्रफुल्ल कोल्हे, पत्रकार महेश शेंडे, मोहन देशमुख, राजेश काळे, प्रा. अशोक पिंपरे, संजय दुरबुडे, गुड्डू मेहता, दादू भोयर, नितीन कोमेरवार, राजू झलके, शशिमोहन लढी, समिर लाखाणी, अमोल पंडित, उमेश कोसुळकार, चेतन बेंभारे, रोशन भाविक, शाम कन्नाके, शरद एकोणकर, अंकित बोटरे, महेश परचाके, नितीन बेंभारे साहिल लाखाणी, ओम कोसूळकार, राज झाडे, ओम बेडदेवार, रोहनक झाडे, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राळेगाव समाचार चे संपादक फिरोज लाखाणी यांनी प्रस्ताविक केले.
